मनोगत
शहरीकरणाच्या रेट्यात लोकांना दैवी शक्ती च अस्तित्व मान्य करायला अजिबात वेळ नाही त्याच कारण पण आहे लोकांना दैवी शक्ती ची जाणीव शहरात राहुन कधी होतच नाही जे घडत आहे ते आपणच करत आहेत या भावनेने संपूर्ण आयुष्य शहरी भागात काढल जात आहे. मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा फक्त इथे बघायला मिळते त्यामुळे कर्मयोगावर जास्त भर आहे आणि तो ठिक पण आहे....
ध्यान आणि जप याच महत्व या लोकांना तेंव्हा समजत जेव्हा हे सगळे डिप्रेशन च्या टोकावर उभे राहतात. रिचवलेली दारु सुध्दा चढत नाही एवढ्या तणावाखाली ही मंडळी आली की मग देव आठवतो खर तर देव पण नाही आठवत "सायकास्ट्रिस्ट" आठवतात तिथल्या गोळ्या खाणे आणि धावत राहणे एक दिवस मुल सोडुन जातात कर्तव्य पूर्ती होते आणि मग पोकळी निर्माण होते.
अध्यात्मिक व्यक्ती ला ही पोकळी कधीही निर्माण होत नाही. शेकडो साधक एकाच नाळेने जोडलेले असतात. जसा जन्म सुखाने जातो तसा शेवट पण सुखकारकच हवा ना! यासाठी या सामील व्हा "सिध्दाश्रम सत्संग परिवारात"
ना कुठल आमिष दाखवल जात.
ना कुठले प्रोडक्ट विकले जातात
ना कुठल्या खिसे भरण्यासाठी यात्रा आयोजित केल्या जातात.
काही नाही केल जात! जे पारंपरिक सत्य अध्यात्मिक जीवन आहे याची कास धरली जाते.
शंकर महाराज चरणापर्णमस्तु
बालाजी निपाणीकर
सिद्धाश्रम परिवार